उल्हासनगर - तरूण, तडफदार, दिलदार व्यक्तिमत्व प्रसिद्ध उद्योगपती नंदसेठ छापरु यांचा भुल्लर महाराजांच्या नेतृत्व शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे त्यामुळे शहरातील राजकारण चांगलेच तापले आहे.
उल्हासनगरचे उद्योजक श्री. नंद छापरु यांनी आज शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख श्री गोपाल लांडगे साहेब व शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक श्री. राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांची भेट घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश करीत नामदार मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्यनेते माननीय श्री. एकनाथ शिंदे साहेबांना आपला पाठींबा जाहीर केला यावेळी श्री गोपाळ लांडगे साहेबांनी त्यांना पुढील राजकिय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post a Comment