उल्हासनगर:
आज दिनांक १९/०९/२०२२ रोजी उल्हासनगर स्टेशन विसर्जन घाट येथे उल्हासनगर महानगरपालिका व अशोका फाउंडेशन च्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सफाई अभियान राबविण्यात आले.
सदर अभियाना मध्ये महानगर पालिका उप आयुक्त (आरोग्य) श्री.जाधव साहेब, सार्व.आरोग्य अधिकारी श्री.हिवरे साहेब,मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री पवार साहेब, माजी नगरसेवक श्री.शेळके साहेब,जमील खान साहेब, समाज सेवक श्री. रगडे साहेब, फिरोज खान प्रमोद घनबहादुर अखिलेश गुप्ता तसेच अशोका फाउंडेशन चे सर्व सभासद , स्वच्छता निरीक्षक, आणि प्रभागातील सर्व मुकादम व कामगार यांनी सदर अभियाना मध्ये आपले योगदान देऊन सर्व विसर्जन घाट परिसर सफाई आणि स्वच्छ करून घेतला.
जो पर्यंत नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग स्वच्छ भारत अभियानात होत नाही तो पर्यंत शहर स्वच्छ होणारं नाही त्यामुळेच हे स्वच्छता अभियान घेतल्याचे मत शिवाजी रगडे यांनी व्यक्त केले
Post a Comment