कल्याण ग्रामीण:
काल रात्री १चा सुमारास कल्याण चा दिशेला एक महिंद्रा पिकप मध्ये म्हैस भरून भरधाव वेगाने घेऊन चालला होता. छोट्याशा पिकप मध्ये जवळपास आठ जनावरे डांबून ठेवले होते. त्यामधील एक पारडे पिकपच्या मागील फळक्या मधून बाहेर पडले.आणि ते पारडे वाहन चालक फरफडत घेऊन चालला होता.वरपगावातील स्थानिक रहिवासी प्रल्हाद भोईर, तुषार म्हसकर, साहिल म्हात्रे, जयेश भोईर,वामन भोईर निकेत व्यवहारे आणि त्यांचा इतर साथीधाराने ते पाहिले असता. त्या वाहन चालकाचा पाठलाग करत गाडी अडवली.आणि म्हारळ पोलिस चौकी मधील मेजर निकेश मांडोळे आणि संजय वाघ साहेब यांना कळविले असता त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वाहन चालकाचे नाव तोफिक फकीर असून त्याला विचारणा केली असता.जुन्नर वरून कल्याणचा दिशेला तो जात होता.त्याचा कडे कोणत्याच प्रकारचे जनावरांचे खरेदी विक्रीचे बिल नसल्या कारणामुळे.महिंद्रा पिकप वाहन जप्त केले आहे आणि त्या मध्ये ५ म्हैस आणि ३पारडे असुन त्या जनावरांना रायता पांजरापोळ येथे ठेवण्यात आले.आणि वाहन चालक आणि गाडी गोवेली पोलिस स्टेशन येथे जप्तीची कारवाई केली.कलम ५४५/२२ IPC ४२३,६६,१९२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ते जनावरे नेमके कसा साठी घेऊन चालले होते याची चौकशी यशवंत निकम साहेब करीत आहेत.टिटवाळा पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या म्हारळ चौकी मधील पोलिसांनी धडक कारवाई केल्याबद्दल त्यांच्यावर कौतिकीचा वर्षाव होत आहे.
Post a Comment