उल्हासनगर:
उल्हासनगर महानगर पालिकेच्या मुख्यालयात जवळपास सर्व महापुरुषांची जयंती महापालिका प्रशासनाच्या वतीने साजरी केली जाते यात कुठलीही शंका नाही.परंतु आपल्या शहरात विविध ठिकाणी या महापुरुषांचे स्मारक ( पुतळे ) उभारण्यात आले आहेत.महापालिका प्रशासन मुख्यालयात तर जयंती व पुण्यतिथी साजरे करते परंतु या स्मारकांकडे दुर्लक्ष करते व ही बाब निषेधार्थ आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी मागणी केली की उल्हासनगर महापालिका क्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे आहेत त्या त्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने या सर्व महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यात यावी.तसेच यासाठी मंडप,रोषणाईसह इतर खर्च महापालिकेच्या वतीने करण्यात यावा अशीही मागणी बंडू देशमुख यांनी केली आहे.
Post a Comment