महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार।

 


उल्हासनगर - शहरात विद्युत वितरण कंपनीने थकीत वीज बिलाची वसुली सुरू केली असून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे नगरसेविका सविता तोरणे यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली आणि नागरिकांना सहकार्य करण्याची मागणी केली तसेच आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे अशी माहिती नगरसेविका सविता तोरणे यांचे भाऊ समाजसेवक शिवाजी रगडे यांनी दिली या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, उल्हासनगर शहरात विद्युत बिल वाटप न करता थकित विद्युत बिलासाठी होणारी धडक कार्यवाही थांबबिण्याबाबत टीओके नगरसेविका सविता तोरणे-रगडे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला निवेदन दिले आहे। त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की लॉकडाऊनमधे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले असुन आर्थिक परिस्थिती गंभीर आहे, अजुनही परिस्थिती पूर्णतः साधारण झालेली नाही, गोरगरीब नागरिकांच्या मुलांची शाळेची फी थकित असुन त्यासाठी खाजगी शाळा व्यवस्थापना बरोबर संघर्ष सुरू असताना आता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने थकित विद्युत बिलासाठी धडक कार्यवाही सुरु केली आहे। काही दिवसांपासुन सम्राट अशोक नगर तसेच शहरात ठिक-ठिकाणी थकित विद्युत बिलाबाबत धडक कार्यवाही करुन मीटर काढण्यात येत आहेत। दर महिन्याला विद्युत बिल न देता काही दिवसांपासून धडक कार्यवाही सुरू केल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे।

नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारी नुसार नगरसेविका सविता तोरणे-रगडे यांच्या वतीने युवा समाजसेवक शिवाजी रगडे व भावी नगरसेवक फिरोज खान यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता दवंगे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता स्वामी व उप अभियंता घाटोळ यांची भेट घेऊन या विषयी चर्चा केली व लेखी निवेदन देऊन नागरीकांना थकित विद्युत बिला संदर्भात धडक कार्यवाही न करता पुर्व सूचना देऊन बिल भरण्याची संधी द्यावी। अधिकाऱ्यांनी विषय गांभीर्याने घेत।

सर्वत्र थकित बिल भरण्यासाठी परिसरात रिक्षा व लाऊडस्पिकर द्वारे नागरीकांना पुर्व सूचना दिल्या जातील अशी माहिती दिली। ज्यांची परिस्थिती बिकट आहे त्यांना दोन टप्यात बिल भरण्याची सवलत दिली जाईल। तसेच मागासवर्गीयांसाठी नविन मिटर जोडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने अंतर्गत मात्र ५०० रूपयात दिली जाईल असेही दवंगे यांनी सागितले जर कार्यवाही थांबवली नाही तर नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवाजी रगडे आणि फिरोज खान यांनी दिला आहे. यावेळी विजय स्टॅलिन हे देखील उपस्थित होते।Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget