जनसामान्यांच्या समस्यांवर आंदोलन उभारणाऱ्या मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांचा आदरणीय शर्मिलाताई ठाकरे यांच्या हस्ते जाहीर सत्कार.

 
उल्हासनगर :

इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात सुरू केले गेलेले आंदोलन म्हणून स्वतंत्र भारतात ९ ऑगस्ट हा दिवस क्रांतिदिन म्हणून साजरा केला जातो,आणि ९ ऑगस्ट २०२३ रोजीच दुपारच्या वेळेस उल्हासनगर शहरातील मनसे, मनविसेच्या महाराष्ट्र सैनिकांनी गोरगरीब विद्यार्थी आणि पालकांना जेरीस आणणाऱ्या मुजोर न्यू इंग्लिश शाळा प्रशासनाला खळ्ळ खट्याक पद्धतीने मनसेचा दणका दिल्यानंतर आंदोलनात सहभागी असलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर शाळा प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आला,आणि नंतर सर्वांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली.

जनसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडणारे,गोर-गरिबांच्या प्रश्नांवर आक्रमक होऊन वेळ प्रसंगी स्वतःच्या अंगावर गुन्हे दाखल होतील याची भीती सुद्धा न बाळगणाऱ्या कडवट महाराष्ट्र सैनिकांचा जाहीर सत्कार आदरणीय शर्मिलाताई राज ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवार दि.८ सप्टेंबर रोजी टाऊन हॉल येथे करण्यात आला,सचिन कदम,मैनुद्दीन शेख,कल्पेश माने,वैभव कुलकर्णी,रवी बागुल,अशोक गरड,सुभाष हटकर,काळू थोरात,संजय नार्वेकर यांच्यावर  शाळा तोडफोड प्रकरणात गुन्हे दाखल झालेले होते.

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पदाधिकारी श्रीमती शफियाताई सय्यद आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी ही समस्त महाराष्ट्र सैनिकांच्या मायमाऊली आणि नेहमी जिजाऊंसारखे प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व श्रीमती शर्मिलाताई ठाकरे यांना स्वराज्य जननी जिजाऊ यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार केला.

सखी सामाजिक संस्थेच्या वतीने सिमरन लालजीवाणी आणि मनसेचे सचिन कदम यांच्या प्रयत्नांनी आयोजित मंगळागौर या कार्यक्रमात शहरातील अनेक बचत गटातील महिला सहभागी झालेल्या होत्या,गृह उद्योगांच्या माध्यमातून महिलांनी सक्षम झाले पाहिजे आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी सखी सामाजिक संस्थेच्या वतीने केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचे शर्मिलाताई ठाकरे यांनी तोंडभरून कौतुक केले.तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना महिलांच्या दैनंदिन जीवनातील कोणत्याही समस्या असतील,प्रश्न असतील त्या सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नरत असतील अशी ग्वाही शेवटी आदरणीय शर्मिलाताई राज ठाकरे यांनी उपस्थितांना दिली.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या उपाध्यक्षा श्रीमती शालिनीताई ठाकरे,रिटाताई गुप्ता,उल्हासनगर च्या माजी महापौर श्रीमती मीना कुमार आयलानी,दिपीकाताई पेडणेकर,योगीताताई पाटील, उर्मिलाताई तांबे,चेतना रामचंद्रन, नयनाताई भोईर,स्वाती कदम तसेच मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होता.

Post a Comment

[facebook][blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget