१७ करोड रुपयांची भरमसाठ आरोग्य साहित्यची खरेदी नेमकी कोणाच्या भल्यासाठी - मनसे


उल्हासनगर:

उल्हासनगर महागनगर पालिकेच्या वतिने निविदांवर निविदा काढल्या जात आहेत. पण खरंच आपल्याला आता एवढया मोठ्या प्रमाणात आरोग्य साहित्याची आवश्यकता आहे का.? जेव्हा आपल्याला खरोखर गरज होती तेव्हा आपण हया सर्व  उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत. आता गरज नसतांना शासना कडुन येणाऱ्या कोटयावधी रुपयाच्या निधीचा असा वापर नेमका कुणाच्या भल्यासाठी असा खोचक प्रश्न मनसे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी महापालिका प्रशासनाला विचारलाय.

शहरातील नागरिक आपल्या रुग्ण नातेवाईकाला घेऊन जेव्हा शहरभर उपचारासाठी दर-दर भटकत होते व जेव्हा शहरातील रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन व व्हेन्टिलेटर बेड मिळत नव्हते. तेव्हा कितीतरी रुग्णांनी ऑक्सिजन व व्हेन्टिलेटर बेड अभावी आपले प्राण गमावलेत. तेव्हा हया वस्तु आपण का खरीदी केल्या नाहीत असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केलाय. मग आता नको तिथे ही उधळपट्टी कशासाठी आणि नेमकी कुणाच्या फायदयासाठी केलीय जातेय.जेव्हा शहरातील लोकांना खरोखर आपल्या मदतीची गरज होती. तेव्हा शहरातील जनतेच्या पाठिमागे उभे न राहता आपण खाजगी रुग्णालयांच्या पाठिमागे मागे उभे राहिलो.जेव्हा खाजगी रुग्णालये लोकांची दोन दोन अडीच अडीच, तिन तिन लाखाची बिल बनत होते. तेव्हा आपले प्रशासन फक्त कागदी घोडे नाचविण्यात व्यस्त होते. शहरातील नागरिकांनी आपल सोनं, घरदार विकून किंवा कर्ज काढून आपल्या नातेवाईकांची लाखो रुपयाची बील भरलीत तेव्हा प्रशासनाने हया उपाययोजना का केल्या नाहीत.तेव्हा जर हया उपाययोजना केल्या असत्या तर कितीतरी लोकांचे प्राण वाचले असता असेही ही बंडू देशमुख म्हणाले.

मा.आयुक्त साहेब जेव्हा तुमची नियुक्ती आमच्या उल्हासनगर महानगर पालिकेत झाली तेव्हा आमच्यासह शहरातील सर्वच नागरिकांना खुप आनंद झाला होता की आम्हांला एक डॉक्टर आयुक्त मिळाले आता कोरोणा संकटावर आम्ही सहज मात करु शकतो.आपल शहर लवकरच कोरोना मुक्त होणार व आजच्या रुग्णांची संख्या पाहता तसे झाले सुध्दा आहे.

1) मग 8 कोटी 80 लाखाची निविदा काढलीय त्यात 90 हजार फेसशिल्ड, 81 हजार गॉगल, 90 हजार N-95  मास्क, 81 हजार surgical मास्क, व इतर साहित्य

  २) 2 कोटी 80 लाखाची जी निविदा काढलीय त्यात 2620 हॉस्पिटल बेड, 13500 बेडशीट,5400 ब्लॅंकेट, 5400 सोलापुरी चादर,  2700 शे पिलो व ईतर साहित्य खरेदी करताये

  3) मुरबाड रोड वरील ताबोर आश्रम येथे 400 बेड साठीची ऑक्सिजनची टाकी, पाईप लाईन फिटिंग, तसेच पार्टीशन साठी आपण जवळ पास 1 कोटी 50 लाखाची निविदा काढली याची खरच गरज आहे का..?

 या सह ईतर ही निविदाही आपण काढल्या आहेत हे नेमक काय चाललय जनतेला पण कळू दया कारण शेवटी हे पैसे जनतेच्या करातले पैसे आहेत.साहेब या संपूर्ण पैशातुन महानगर पालिकेच एक अत्याधुनिक रुग्णालय उभ राहु शकत.आणि त्याची आपल्या शहराला गरज देखील आहे. जर तुम्ही हे रुग्णालय उभ केल तर या शहरातील जनता आपली आयुष्यभर ऋणी राहिल. हे पैसे नको तिथे खर्च करण्याऐवजी आम्हांला एक सुसज्ज व अत्याधुनिक महानगर पालिकेच  रुग्णालया दया अशी मी विनंती मनसेच्या वतिने आयुक्तांना करण्यात आली आहे.

जर आपण महापालिकेच रुग्णालय उभ करु शकत नसु तर हे पैसे या प्रकारच्या निवेदेवर खर्च करुन ठेकेदाराच भल करण्यापेक्षा या पैशातुन शहरातील प्रत्येक कोरोणा पॉझिटीव्ह नागरिकांच खाजगी रुग्णालयांच जे बिल आहे ते आपण महापालिकेच्या माध्यमातून भरण्याची मागणी सुध्दा बंडू देशमुख यांनी आयुक्तांन कडे केली आहे.

आज आपल्याला ज्या गोष्टींचीं खरोखर गरज असेल त्या आपण नक्की करा आम्ही आपल्या सोबत आहोत. पण गरज नसतांना जर कुणाच्या तरी फायदयासाठी हे सर्व करत असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मा. उच्च न्यायालयात दाद मागेल असेही पञाता नमुद केल आहे.



Post a Comment

[facebook][blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget