१४ एप्रिल अगोदर रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे उल्हासनगर महानगर पालिकेच्या प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा.

 


उल्हासनगर - 


आगामी १४ एप्रिल पूर्वी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती केली नाही तर वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे उल्हासनगर महानगर पालिकेच्या प्रशासनाला आंदोलन करावे लागेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष रतन महाले यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की आगामी १४ एप्रिल रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती यंदा उल्हासनगर शहरात सालाबादा प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. जयंती साजरी करतेवेळी मोठमोठ्या मिरवणूक उल्हासनगर शहरातुन काढण्यात येणार असून यात लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी नेहमीप्रमाणेच उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जाते.

याबाबत पालिका प्रशासनाला माहिती असतानाही उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने उल्हासनगर शहरात कित्येक महिन्यांपासून ठिकठिकाणी खोदून ठेवलेले रोड रस्ते अद्यापही दुरूस्त केलेले नाहीत. म्हणून आज वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर पश्चिम शहराचे अध्यक्ष श्री. उज्वल रतन महाले यांनी पालिका प्रशासनाला इशारा दिला आहे की जर पालिका प्रशासनाने १४ एप्रिलच्या अगोदर उल्हासनगर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती केली नाही तर आम्हाला आंदोलन करावे लागेल.

महाले यांनी म्हटले आहे की  महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीला आंबेडकरी जनतेला कुठल्याही अडचण नको म्हणून लवकरात लवकर दुरुस्त करून जयंतीच्या आड येणाऱ्या सर्वच अडचणी दूर कराव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर पश्चिम शहराचे अध्यक्ष उज्वल रतन महाले यांनी केले आहे.
Post a Comment

[facebook][blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget