स्व.रोहित भाई भोईर स्मृती चषक स्पर्धा संपन्न.


 

कल्याण:


                    स्वर्गीय रोहित भाई भोईर प्रतिष्ठान आयोजित स्व.अनिकेत पाटील, स्व.सागर ताम्हणे आणि स्व. रोहित भाई भोईर स्मृती चषक २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. १डिसेंबर ते ४ डिसेंबर पर्यंत असे चार दिवस क्रिकेटचा महासंग्राम वरप येथील सीमा रिसॉर्ट ग्राउंड मध्ये  मोठया उत्साहात पार पडला.या स्पर्धेमध्ये ३२ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धे चे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले नितेश इलेव्हन जय हनुमान संघ वरप आणि द्वितीय क्रमांकाचे स्व. अनिकेत पाटील पुरस्कृत सुरई संघ, तसेच तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला नायरा महेश भोईर पुरस्कृत वाडेकर संघ,यावेळी क्रिकेट संघांना सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम प्रथम क्रमांकास ५० हजार,द्वितीय क्रमांकास २५ हजार, तृतीय क्रमांक ११हजार, आणि स्पर्धे मधील सर्वोत्कृष्ट खेळाडूला स्पोर्ट सायकल देण्यात आली. तसेच स्पर्धेला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. काही दिवसांपूर्वी  कल्याण येथे गॅस लिकेज स्पोटा मध्ये सहा जणांचा जीव वाचवणारे कर्तव्यदक्ष पोलीस दीपक घरत यांचा सन्मान करण्यात आला.तसेच किल्ले स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या, दिलीप प्रवीण भोईर, शिवसंगडी ग्रुप, संयुक्त गट, या स्पर्धकांना बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आणि स्व.रोहित भाई भोईर प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार बांधवांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

Post a Comment

[facebook][blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget