उल्हासनगर शहरात पसरलय धुळीच साम्राज्य.






उल्हासनगर:

उल्हासनगर महानगर पालिका शहरातील नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी वारंवार प्रवृत करते.मालमत्ता कर वेळेवर भरला नाही तर महानगर पालिका नागरिकांकडून २% शास्ती म्हणजे ( व्याज ) वसुल करते.आणि दोन तिन वर्ष जर मालमत्ता कर भरला नाही तर महानगर पालिका व्याजावर पण व्याज घेते.काही वेळेला तर थकबाकी वसुल करण्यासाठी थकबाकी दाराच्या घरा बाहेर ब्यांन्ड बाजा वाजून थकबाकी दाराला अपमानित केलं जात.आणि तरीही मालमत्ता कर भरला नाही तर महापालिका प्रशासनाच्या वतीने मालमत्ता जप्त करण्याची धमकी देण्यात येते.काही मालमत्ता जप्तही केल्या जातात.महपालिका प्रशासन मालमत्ता कराची थकबाकी वसुल करण्यासाठी जर एवढ सर्व करत असेल तर मग शहरातील नागरिकांना चांगले रस्ते,स्वच्छ पाणी,शहरातील स्वच्छता,कचऱ्याची विल्लेवाट लावण्यासह इतर मूलभूत सुविधा पुरवण्याची जबादारी नेमकी कुणाची आहे असा खोचक प्रश्न मनसे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी पालिका प्रशासनाला विचारला आहे.

शहरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पावसाळ्यात शहरातील नागरिकांनी जिवघेण्या खड्डयातून या आशेने कसाबसा मार्ग काढत प्रवास केला की कमीतकमी पावसाळा संपल्यानंतर तरी महापालिका प्रशासन आपल्याला चांगले रस्ते देईल परंतु पावसाळा संपून महिना उलटला तरी आज पर्यंत शहरातील रस्ते चांगले झालेले नाहीत हे दुर्दैव आहे.गेल्या २६ वर्षात उल्हासनगर महापालिकेने शहरातील रस्त्यांच्या देखभाल दुरुस्ती साठी २००  कोटी रुपयाच्या वर खर्च केलाय परंतु गेल्या २६ वर्षात शहरातील नागरिकांना चांगले रस्ते व चांगल्या मूलभूत मिळाल्या नाहीत हे अपयश नक्की कुणाचं प्रशासनाच की २५ वर्षे सत्ता भोगणाऱ्या सत्ताधाऱ्यांच असाही प्रश्न बंडू देशमुख यांनी उपस्थित केला.या आयुक्तांच्या कार्यकाळात तरी शहर वशियांना लवकरात लवकर चांगले रस्ते मिळतील अशी अशा होती.परंतु चांगले रस्ते तर सोडा आज शहरातील रस्त्यावर मोठया प्रमाणात धुळीच साम्राज्य पसरले आहे.शहर भर पसरलेल्या धुळीमुळे नागरिकांना श्वसणाच्या त्रासासह इतर आजारांचा सामना करावा लागत आहे.ही धूळ सातत्याने दुकानात जात असल्यामुळे व्यपाऱ्यांचही आरोग्य धोक्यात आलं आहे.धुळी मुळे दुकानातील सामान खराब होत असल्याने व्यापाऱ्यांच मोठया प्रमाणात आर्थिक नुकसानही आहे.प्रशासन मात्र धुतराष्ट्र सारखी डोळ्यावर पट्टी बांधून बसलं आहे अशी प्रतिक्रिया संजय घुगे यांनी दिली.झोपेच सोंग घेणाऱ्या प्रशासनाला जागे करण्यासाठी मनसेच्या वतीने नागरिकांना धुळीच्या बचावा साठी मास,खड्यामुळे होत असलेल्या वेदनांसाठी वेदना नाशक मलम व धुळीने माळलेले कपडे धुण्यासाठी सर्फच प्याकेटच वाटप करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला यावेळी उपजिल्हा सचिव संजय घुगे,शहर अध्यक्ष बंडू देशमुख,मनविसेचे जिल्हा संघटक मनोज शेलार,उपसहर अध्यक्ष सचिन बेंडके,अनिल जाधव,मुकेश शेठपलांनी,शैलेश पांडव,सुभाष हटकर,विभाग अध्यक्ष अक्षय धोत्रे,केलास वाघ,योगीराज देशमुख,प्रमोद पालकर,बादशहा शेख,उपविभाग अध्यक्ष देवा तायडे,गणेश आठवले,रवी पाल, विक्की जिप्सन,जाफर शेख,मनविसेचे सचिन चौधरी,विजय पवार,गोरख उदार,रवी अहिरे,सुनील शेलार,शाखा अध्यक्ष प्रकाश कारंडे,धिरज सेठपलांनी,दिलीप थोरात यांच्यासह मनसेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








Post a Comment

[facebook][blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget