तक्रारी व समस्यां तात्काळ सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्याने महावितरण विरोधात पुकारलेले मनसेचे लाक्षणिक उपोषण मागे।

          उल्हासनगर - वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठा व नागरिकांच्या विविध तक्रारीची कोणतीही दखल न घेणाऱ्या महावितरण विभागाच्या गलथान कारभारा विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गोडसे व समाजसेवक संजीव कांबळे यांनी उल्हासनगरमध्ये लाक्षणिक उपोषण सुरू करताच महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री सावंत यांनी उपोषण स्थळी भेट देऊन सर्व तक्रारी व समस्यां तात्काळ सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्या मुळे लाक्षणिक उपोषण मागे घेण्यात आले।

          यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे, वाढीव बिले, कमी दाबाचा विद्युत पुरवठा, नादुरुस्त मीटर बदलणे,  याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रदीप गोडसे, व समाजसेवक संजीव कांबळे यांनी महावितरण विभागात कित्येक वेळा लेखी निवेदने दिली होती मात्र या तक्रारीची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. अखेर आज लाक्षणिक उपोषणाचा पावित्रा घेण्यात आला.  उपोषणकर्ते श्री प्रदीप गोडसे व श्री संजीव कांबळे यांनी जनहितार्थ केलेल्या मागण्या व नागरिकाच्या तक्रारी  सोडविल्या जाणार नाही तो पर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पावित्रा घेतला होता. अखेर  उल्हासनगरचे अतिरिक्त अभियंता श्री दिलीप कुंभारे, कनिष्ठ अभियंता श्री प्रवीण भांगे व श्री बीरे यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसेच लाईटच्या सर्व तक्रारी लवकरात लवकर सोडवण्यात येतील असे लेखी आश्वासन देण्यात आले असून श्री प्रदीप गोडसे व श्री संजीव कांबळे यांनी लाक्षणिक उपोषण मागे घेतले।
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget