उल्हासनगर:
१९४२ च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल यांची १ डिसेंबर रोजी साजरी होणाऱ्या जयंतीनिमित्त उल्हासनगर शहरातील कँम्प नंबर -४ येथील व्हिनस सिनेमा जवळील स्टेशन रोड वर असलेल्या क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल चौकाचा उल्हासनगर महानगरपालिका च्या वतीने करण्यात येणाऱ्या नुतनीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल चौक स्मारक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जयंती कार्यक्रमात कल्याण पूर्व विधानसभेचे आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते चौकाच्या नुतनीकरण कामाचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी अखिल भारतीय जिवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पिंपळगांवकर, कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक राज असरोंडकर, जेष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
Post a Comment