बाल दिवस निमित्ताने उल्हासनगर महानगर पालिकेतर्फे मोफत तपासणी शिबिर.





 




उल्हासनगर - बाल दिवस निमित्ताने उल्हासनगर महानगर पालिकेचे आयुक्त अजीज शेख यांच्या पुढाकाराने पालिकेतर्फे मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला विद्यार्थी आणि पालकांनी मोठा प्रतिसाद दिला.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की,उल्हासनगर महानगरपालिका समग्र शिक्षा समावेशित शिक्षण व रिद्धी सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख मुकेश खेमचंदानी व मानसोपचार तज्ञ  डॉक्टर गौरव त्रिवेदी यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुला मुलींची १४ नोव्हेंबर २०२२ रोजी बाल दिवस या निमित्ताने मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. ही तपासणी सेक्शन २२ कवाराम चौक उल्हासनगर - ३ येथे रिद्धी सिद्धी पॉली क्लिनिकमध्ये करण्यात आले. यामध्ये ७० पेक्षा अधिक दिव्यांग मुला-मुलींना तपासण्यात आले. या तपासणीमध्ये डॉक्टर गौरव त्रिवेदी यांनी दिव्यांग मुलांची जन्मल्यापासून प्राथमिक तपासणी व तसेच दैनंदिन जीवनात येणाऱ्या  समस्या व त्याचे निवारण, कौशल्य मानसिक ,शारीरिक आजार व इतर वर्तनुक समस्या याबाबत सविस्तर चर्चा पालकांसोबत  केली व त्याबाबत तशा उपाययोजना सांगितल्या व तसेच श्री मुकेश खेमचंदानी यांच्यामार्फत मोफत औषध उपचार सुद्धा प्रत्येक रुग्णांना देण्यात आले. यामध्ये मनपा शाळा, विनाअनुदानित खाजगी अनुदानित, स्पेशल शाळांनी सहभाग घेतला व तसेच शिबिरामध्ये जास्त प्रमाणात विद्यार्थी वाढल्यामुळे विद्यार्थ्यांची तपासणी करिता पुढील दुसरा कॅम्प घेण्याबाबतचे नियोजन माननीय डॉक्टर गौरव त्रिवेदी यांच्यामार्फत करण्यात आले. १४ नोव्हेंबर २०२२ रोजी भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जन्मदिनानिमित्त मोफत शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विद्यार्थी पालकांचा प्रतिसाद खूप छान लाभला. हे शिबिर रात्री १०.३० पर्यंत सुरू होते. सदरचा दिव्यांग मुला मुलीं करिता Neuropschyatric Consultation शिबिर घेण्याकरिता समग्र शिक्षाचे अध्यक्ष व उल्हासनगर महानगरपालिकेचे माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री अजिज शेख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. सदर शिबिर घेण्याकरिता माननीय अतिरिक्त आयुक्त शहर श्री. जमीर लेंगरेकर यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.. तसेच शिबिरामध्ये उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव, प्रशासनाधिकारी हेमंत शेजवळ उपस्थित होते. माननीय उपायुक्त  डॉक्टर सुभाष जाधव यांनी विद्यार्थ्यांना पालकांना मार्गदर्शन केले. एकंदरीत सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील Counseling समुपदेशनची किती अत्यंत आवश्यकता आहे याबाबत सविस्तर माहिती माननीय अतिरिक्त आयुक्त श्री. जमीर लेंगरेकर साहेबांनी दिली. यामध्ये केंद्र शासनाकडून दिव्यांग मुलांना मिळणाऱ्या सोयी सुविधा व इतर उपक्रम तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांकरीता थेरेपी सेंटर,(MPRTC centre) Autism सेंटर, Learning Disability Assessment Centre व दिव्यांग मुला मुली दिव्यांग व्यक्तींकरिता गार्डन असे विविध उपक्रम करण्याकरिता समग्र शिक्षा समावेशित शिक्षण व दिव्यांग कल्याणकारी योजना यांना आदेशित केले आहे. तसेच शिबिर यशस्वी करण्याकरिता समग्र शिक्षा समावेशित शिक्षण अंतर्गत तज्ञ कर्मचारी श्रीमती संगीता लहाने काळे, योगेश मराठे ,असलम शेख,मनीषा पवार ,राजश्री पाटील यांनी सहकार्य केले.





Post a Comment

[facebook][blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget