उल्हासनगर शहरात मोठया प्रमाणात होणारी पाणी गळती व शहरातील विविध भागात जाणीवपूर्वक कमी दाबाने केला जाणारा पाणी पुरवठा.

 


उल्हासनगर:


                 उल्हासनगर शहराला MIDC कडून दिवसाला जवळपास 140 ते 145 MLD पाणी पुरवठा केला जातो.व आपल्या शहरातील लोकसंख्या पाहता आपल्याला 110 ते 115 MLD पाणी पुरेसे आहे.म्हणजेच midc आपल्याला दररोज 25 ते 30 mld पाणी अतिरिक्त देते तरी सुद्धा दररोज बऱ्याच विभागात सुरळीत पाणी पुरवठा केला जात नाही.अनेक नागरिकांना तर दोन दोन दिवस पाणी मिळत नाही ही बाब गंभीर आहे.व याच मुख्यकारण म्हणजे संपूर्ण शहरात मोठया प्रमाणात होणारी पाणी गळती व पाण्याची चोरी व या पाणी गळतीला फक्त आणि फक्त अधिकारी व ठेकेदार जबादार आहेत.कारण विविध ठिकाणी पाईप लाईन टाकतांना निकृष्ट दर्जाच साहित्य वापरलं जात. नियमानुसार महापालिके कडून पाईप लाईनच काम करतांना DI च्या पाईपचा वापर व्हायला हवा परंतु ठेकेदार जास्त रकमेचा ठेका घेऊन कमीतकमी खर्चात काम कस होईल या चक्कर मध्ये असतो.त्यातच पाईप लाईनच काम करतांना प्रशासना काडून DI च्या पाईप ऐवजी GI च्या "C" Class च्या पाईप वापरण्याच काम दिल जात.परंतु ठेकेदारा कडून "A" class च्या पाईपला "C" चा कलर मारून "C" class च्या पाईप ऐवजी "A" च्या निकृष्ट दर्जाच्या पाईपचा वापर केला जातो.हा पाईप 4 ते 6 महिन्यात सडतो मग पाणी गळतीची तक्रार येते मग आमचे अधिकारी ठेकेदाराला कुठलीही वर्क ऑर्डर न देता तोंडी आदेश देऊन काम करायला सांगतात ठेकेदार त्या ठिकाणी खोदतो व त्या पाईपला वेल्डिंग करतो.थोडयाच दिवसांनी तोच पाईप वेल्डिंगच्या पुढे सडतो परत ठेकेदार पुढे वेल्डिंग करतो हा सिलसिला संपूर्ण शहर भर वर्षे ना वर्ष सुरु आहे.व कामात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला जातो.व अशा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दिवसाला कितीतरी MLD पाणी वाया जाते.वारंवार रस्ते खोदले जातात.परंतु या बाबतआपल्या अधिकाऱ्यांनां कुठलंही सोयर सुतक नाही असा आरोप मनसे शहर अध्यक्ष बंडू देशमुख व जिल्हा सचिव संजय घुगे यांनी केला आहे.


मी आपल्याला या निवेदनच्या माध्यमातून विनंती करतो की हा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार,पाणी गळती मुळे रस्त्यांच होणार खोदकाम व या खोदकामामुळे रस्त्याच होणार नुकसान,मोठया प्रमाणात होणारी पाणी गळती,पाणी गळती मुळे होणारी पाण्याची नासाडी व या सर्व प्रक्रियेत होणारा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार,ठेकेदारा द्वारे पुन्हा पुन्हा काम निघावं म्हणून केल जाणार निकृष्ट दर्जाच काम हे कुठेतरी थांबायला हवं यासाठी तसेच यापुढे होणार नवीन पाईप लाईन काम तसेच देखभाल दुरुस्तीच्या कामात जास्तीतजात "GI" च्या पाईपचा वापर करून चांगल्या प्रतीच काम करण्यात यावं.शहरातील पाणी गळती बंद करून शेवटच्या नागरिकांन पर्यंत मुबलक पाणी पोहचवण्यात यावं.तसेच शहरातील सर्व विभागातील नागरिकांना सामान पाणी पुरवठा करण्यात यावा,तसेच जानेवारी 2017 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत पाणी गळती बंद करण्यासाठी व पाईप लाईनच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेचा किती खर्च झाला व याला जबादार कोण.? याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शहर अध्यक्ष बंडू देशमुख व जिल्हा सचिव संजय घुगे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Post a Comment

[facebook][blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget