महाराष्ट्र नवनिर्माण महानगर पालिका कामगार सेनेच्या वतीने उ म पा आयुक्त अजीज शेख,अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर,करुणा जुईकर,पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला.

 
      

उल्हासनगर:

           मा.मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व महानगर पालिकांची बैठक घेऊन त्या बैठकीत विविध महापालिकांना शहर विकासाच्या दृष्टीने संकल्पना विचारली असता उल्हासनगर महापालिकेने शहरातील ड्रेनेज लाईन साफ करण्यासाठी रोबोटचा वापर करण्याची संकल्पना मांडली व ही संकल्पना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना आवडल्याने त्यांनी उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त व पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.भविष्यात उल्हासनगर महापालिका ड्रेनेज सफाईसाठी रोबोटचा वापर करणारी पहिलीच महानगर पालिका असेल.26 वर्षात पहिल्यांदाच महापालिकेच कौतुक झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण महानगर पालिका कामगार सेनेच्या वतीने मा,आयुक्त अझीझ शेख,अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर,करुणा जुईकर,पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच आयोजन कामगार नेते दिलीप थोरात यांनी केले होते.यावेळी जिल्हा अध्यक्ष सचिन कदम,जिल्हा सचिव संजय घुगे,शहर अध्यक्ष बंडू देशमुख,शहर सचिव शालिग्राम सोनावणे,उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके,मुकेश सेठपालानी,शहर संघटक मैनुद्दीन शेख यांच्यासह इतर पदाधिकारी व कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.
Post a Comment

[facebook][blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget