उल्हासनगर मध्ये ईद-ए-मिलाद-उन-नबी उत्साहात साजरी.

 

उल्हासनगर:

इस्लाम धर्माचे सर्वश्रेष्ठ असे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणून ईद-ए-मिलाद साजरी केली जाते. हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म मुस्लिम कालगणना रबीउल अव्वल महिन्याच्या बारा तारखेला साजरा करण्यात येतो. ई.स. ५७१ ला हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म मक्का येथे झाला. मोहम्मद पैगंबर हे अल्लाहचे अंतिम प्रेषित होते. इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे त्यांना नबी,रसूल आदी नावांनीही संबोधित केले जाते. इस्लाम मध्ये ईद-ए-मिलाद हा सर्वात मोठा दिवस असल्याचे मानले जाते.

 ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. या दिवशी अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते. इस्लाम धर्मातील मान्यतेनुसार पैगंबर हजरत मोहम्मद हे अखेरचे संदेशवाहक आणि सर्वात महान होते. हजरत मोहम्मद पैगंबर यांनी नेहमी शांततेचा संदेश दिला. त्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे.

 ईद-ए-मिलाद निमित्त मुस्लिम बांधव मशिदीमध्ये यानिमित्ताने विशेष प्रार्थना करतात.तसेच मोहम्मद पैगंबर यांनी दिलेल्या शिकवणीचे स्मरण देखील करतात. तर काही ठिकाणी भव्य मिरवणुका निघतात. या सणाच्या निमित्ताने नागरिक नमाज अदा करून गोरगरिबांना मदत करणे,अन्नदान करणे त्याच पद्धतीने कुराण पठण ही करतात.

मोहम्मद पैगंबर यांनी त्यांच्या आयुष्यात नेहमीच शांततेचा संदेश दिला आहे. सत्य आणि अहिंसेची शिकवण ही नेहमीच मोहम्मद पैगंबर यांनी दिली आहे. त्यांच्या या शिकवणीची आठवण आणि त्यांनी दिलेल्या कुराणची शिकवण ही सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात राहावी आणि त्यांनी आपल्या जीवनात ती अमलात आणावी यासाठी या दिवशी त्याचे पठण आणि शिकवण दिली जाते.

उल्हासनगर शहरात ही मुस्लिम बांधवांकडून ईद-ए-मिलाद निमित्त जुलूम काढण्यात आले,अन्नदान आणि सरबत चे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे मनसेचे शहर संघटक तसेच अहलेवतन मुस्लिम सामाजीक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मैनुद्दीन भाई शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून गोर-गरिबांना अन्नदान करण्यात आले.

 यावेळी बादशहा शेख,वशीम शेख,रियाझ शेख,सोनू शेख,जाफर शेख,तसेच मनसेचे काळू थोरात,राहुल वाकेकर,कल्पेश माने,संजय नार्वेकर,जितू शेट्टी व ईतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

[facebook][blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget