महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मोफत उत्सवाच्या घोषणेमुळे वाढलेले प्रदूषण आणि आमच्या मुलभूत हक्कांच्या उल्लंघनाविरोधात उल्हासनगरात सरिता खानचंदानी यांचे बेमुदत उपोषण.


 



उल्हासनगर -

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ६ सप्टेंबर २०२२ रोजी मोफत उत्सवाची घोषणा केल्यामुळे वाढत्या प्रदूषणाविरुद्ध आणि आपल्या मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाविरोधात लढा देणारी उल्हासनगरची सामाजिक संस्था हिराली फाऊंडेशनच्या अध्यक्षा सरिता खानचंदानी. दुपारी २ वा.पासून बेमूदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना अध्यक्षा सौ. सरिता खानचंदानी यांनी सांगितले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेमुळे जनहित याचिका १७३/२०१०, जनहित याचिका १७३/२०१० च्या आदेशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन केले जात आहे.१५५/२०११, उल्हासनगर उपविभागीय अधिकारी (एस डी ओ), उल्हासनगर महानगरपालिका १५५/२०१६, पोलीस - उल्हासनगर, तहसीलदार, उल्हासनगर महानगर पालिका,  द्वारे जनहित याचिका SDO उल्हासनगर, उल्हासनगर महानगरपालिका आणि प्रशासनातर्फे पोलीस प्रशासनामार्फत जनहित याचिकेवर होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात आंदोलन करण्याची गरज आहे. असे फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता खानचंदानी यांनी सांगितले. उल्हासनगर शहरातील भूमाफियांनी बेकायदेशीरपणे झाडे तोडलेली आहेत यावर उल्हासनगर महापालिकेचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही, तसेच या बिल्डर लॉबींवर पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे मी उल्हासनगर महानगरपालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहे असे हिराली फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता खानचंदानी यांनी सांगितले.




Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget