उल्हासनगर शहरात अवजड वाहनांच्या बेकायदेशीर वाहतुकीमुळे रस्त्यांवरील अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे,उल्हासनगर-१ येथील कमला नेहरू नगर,धोबीघाट परिसरात आठवड्याभरापूर्वी एका इसमाचा अवजड वाहनाच्या खाली चिरडुन दुर्दैवी मृत्यू झालेला होता या पूर्वी ही या रस्त्यावर दोन जणांना वाहनांच्या धडकेमुळे झालेल्या अपघातामुळे आपला जीव गमवावा लागलेला होता।
अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांना शहरात प्रवेशास बंदी असतांना ही अवजड वाहतूक रहिवाशी परिसरातून होतेच कशी ? असा सवाल परिसरातील नागरिक करीत आहेत।
अवजड वाहनांना शहरात प्रवेशास बंदी असतांना ही वाहने शहरात वावरत असल्याने उल्हासनगर वाहतूक पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण झालेले असल्याने उल्हासनगर वाहतूक शाखेने तात्काळ या विषयावर लक्ष केंद्रित करून तोडगा काढावा अन्यथा अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांनी शहरात बेकायदेशीर प्रवेश केल्यास त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल आणि या आंदोलनातील होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी उल्हासनगर वाहतूक शाखा जबाबदार असेल अश्या आशयाचे निवेदन उल्हासनगर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विजय गायकवाड साहेब यांना देण्यात आले।
यावेळी मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख,वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात,विभाग अध्यक्ष बादशहा शेख,शाखा अध्यक्ष शुभम कांबळे,लहुजी सेनेचे शहर अध्यक्ष अवघडे,वाहतूक सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।
Post a Comment